कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! आता नाफेड द्वारे खरेदी केला जाणार शेतकऱ्यांचा कांदा, पहा संपूर्ण बातमी

kanda bajar bhav shifarashi

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज आपण पाहणार आहोत कांदा खरेदी नाफेड मध्ये डीबीटी द्वारे केली जाणार आहे तर कशाप्रकारे खरेदी केली जाणार आहे आणि कांद्याला किती दर मिळू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नाफेडच्या माध्यमातून केली जाणारी कांदा खरेदी आता डीबीटी च्या माध्यमातून केली जाणार आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांदा हा नाफेड मध्ये विक्री केला आहे त्याचे पेमेंट हे 48 तासांमध्ये डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे 2023 मध्ये देशांतर्गत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर कांद्याच्या उत्पादनामध्ये मोठी घट होऊ शकते.

भविष्यामध्ये कांद्याचे भाव वाढू शकतात असे अंदाज लावण्यात आले होते त्यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून देशांमध्ये कांद्याची निर्यात करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे बंदी कायम ठेवण्यात आली आहे काही देशांमध्ये कांद्याची निर्यात करण्यासाठी अंशतः निर्यात बंदी उठवण्यात आली आहे व कांदा निर्यात केला जात आहे परंतु लावण्यात आलेल्या अंदाजाच्या विरुद्ध देशांमध्ये कांदा उत्पादन हे मोठ्या प्रमाणात झाले आहे.

यामुळे शेतकऱ्यांना कांदा अत्यंत कमी दरात विकावा लागत आहे एकंदरीत या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशांतर्गत पाच लाख मेट्रिक टन कांदा हा बबल स्टॉक म्हणून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत स्टॉकची खरेदी नाफेड च्या माध्यमातून केली जाणार आहे.

  • केंद्र शासनाच्या माध्यमातून देशांतर्गत 5 लाख मेट्रिक टन कांदा हा सुपरस्टार खरेदी करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे
  • शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच विकलेला कांदा हा नाफेडच्या माध्यमातून बफर स्टॉक घेतला जावा यासाठी आता तमातून प्रयत्न केले जात आहे 17 ते 18 रुपये पर्यंत कांद्याचे या दराने खरेदी केली जाऊ शकते
  • शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी ने हे पेमेंट करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे नाफेडच्या माध्यमातून खरेदी केला जाणारा कांदा हा डीबीटी च्या माध्यमातून खरेदी केला जाणार आहे

Scroll to Top